| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान संबंध महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. नुकतेच सुधागड तालुक्यात देखील हे अभियान राबविण्यात आले. या अभियानात सुधागड-पाली गटातून ग्रुप ग्रामपंचायत महागाव या ग्रामपंचायतीने सहभाग भाग घेतला. यावेळी अभियान कालावधीत ग्रामपंचायतीने केलेल्या उल्लेखनीय कामांचे व विविध उपक्रमाचे चित्रीकरण शासन स्तरावरून करण्यात आले. या अभियानात पाली पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी लता मोहिते, सहाय्यक विकास अधिकारी अविनाश घरत, अशोक महामुनी, शासन प्रतिनिधी प्रदीप गोरे, मनेश महातो, पंचायत समितीचे धनंजय पाटील, विस्तार अधिकारी, सरपंच दीपिका सुतार, भास्कर पार्टे, महेश दानविले, नितीन भोसले, किसन गवारणे, रमेश जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. तर, ग्रामपंचायत कर्मचारी सचिन शिर्के, ग्रामस्थ तसेच रवी कांबळे, भीमसेन पवार, राम पवार, स्वदेश फाऊंडेशनचे सहकारी किरण शिंदे, महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदींनी उपस्थित राहून सहकार्य केले.







