| पाली/गोमाशी | वार्ताहर |
स्वराज्य युवा संघटना भार्जे यांच्यावतीने जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धांचे आयोजन शनिवारी (दि. 24) भार्जे येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत जिल्ह्यातील 16 नामवंत संघाने आपला प्रवेश नोंदविला होता. या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. या स्पर्धेतील अंतिम लढत पांडबादेवी रायवाडी विरुद्ध चौडेश्वरी कडसुरे या संघात झाली. या लढतीत पांडबादेवी रायवाडी हा प्रथम क्रमांकाच मानकरी ठरला. या संघास रोख रक्कम 21 हजार रु. व आकर्षक चषक, तर द्वितीय क्रमांक चौडेश्वरी कडसुरे या संघास रोख रक्कम 15 हजार रु. व आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकांचा मानकरी मातृछाया कुर्डुस, तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी वरसुआई वाशी या दोन्ही संघास प्रत्येकी 10 हजार रु. व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रशांत जाधव, उत्कृष्ट चढाई निखिल शिर्के, तर उत्कृष्ट पक्कड साहिल पाटील, पब्लिक हिरो समाधान मोरे या खेळाडूंना मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले.