|पाली/गोमाशी |वार्ताहर |
रायगड जिल्हा व सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने बंड्या मारुती क्रिडा मंडळ रासळ यांच्या विद्यमाने जिल्हा स्तरीय भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन रासळ येथे करण्यात आले होते.
या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत संघाने आपला प्रवेश नोंदविला होता.या स्पर्धेसाठी क्रीडाप्रेमीनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.या स्पर्धेतील अंतिम लढत पांडबादेवी रायवाडी विरुद्ध मातृछाया कुर्डूस या संघात झाली .दोन्ही संघाच्या खेळाडूने आपला बहारदार खेळ करत प्रेक्षकांची मने जिंकली .रायवाडी संघाच्या खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवत अंतिम विजयाची मोहर उमटवली.
या स्पर्धेतील अंतिम विजयी संघास रोख रक्कम 21 हजार रु व आकर्षक चषक तर उपविजेता मातृछाया कुर्डूस या संघास रोख रक्कम 15 हजार रु व आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धेतील तृतीय क्रमांकांचा मानकरी जय बजरंग रोहा तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी श्री गणेश कासू या दोन्ही संघास प्रत्येकी 7 हजार रु व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रशांत जाधव(रायवाडी)सायकल , उत्कृष्ट चढाई समाधान मोरे (कुर्डूस) टॉवर फॅन, उत्कृष्ट पक्कड राकेश पाटील(कासु) टॉवर फॅन, पब्लिक हिरो विराज पाटील (रोहा)पंखा ही आकर्षक बक्षिसे देऊन मंडळाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.





