भरडखोलच्या भक्तांची पंढरीची वारी

। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथील विठुरायाच्या भक्तांची पायी होणारी दिंडी मंगळवारी सकाळी निघाली. भरडखोल येथील विठ्ठल रुक्मीनी मंदिर ट्रस्ट व रामचंद्रबुवा वाघे सुखानंद स्वामी, रविंद्र तांडेल, पुरुषोत्तम तांडेल, बळीराम तांडेल, कमलाकर चोगले व हरिचंद्र पावशे यांच्या सहकार्याने या पंढरीच्या चालत होणार्‍या वारीचा 37 वर्ष पुर्ण करीत आहे. वारीत लवकर उठावं लागतं, खुप चालावं लागतं अस काही वारीतील अनुभव येत असला तरी आनंदाने या आषाढी वारीला यावेळी पुढील 20 दिवसात हे अंतर पायी चालतात.कोरोना संकटानंतर यंदा 2 वर्षांच्या खंडानंतर पायी वारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवत आहे. त्यामुळे हा आषाढी वारी सोहळा यंदा थाटात साजरा होणार, अस मत वारीतील जाणकरांनी व्यक्त केले.

Exit mobile version