पांडुरंग लाड यांचे निधन

| कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील हेदवली येथील रहिवासी पांडुरंग भागोजी लाड यांचे मंगळवार, दि.22 ऑक्टोबर रोजी निधन झाले. मृत्यूसमयी ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांचे नातेवाईक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य नागरिक तसेच समस्त हेदवली ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांच्या पश्‍चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, पुतणे, नातवंडे व मोठा लाड परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी गुरुवार, दि. 31 ऑक्टोबर रोजी, तर उत्तरकार्य विधी शनिवार, दि. 2 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानिमित्ताने सकाळी 10 ते 11.30 वाजेपर्यंत हभप रघुनाथ महाराज रसाळ (पेण) यांचे प्रवचन होणार असल्याचे माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

Exit mobile version