| कोलाड | प्रतिनिधी |
संभे गावचे सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग सानप यांची महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गुरुवारी (दि.21) ग्रुप ग्रामपंचायत संभेच्या ग्रामसभेत त्यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रशासक अधिकारी नरेश धुरे, ग्रामविकास अधिकारी रोहिणी गिजे, रोहा तालुका शेकाप चिटणीस शिवराम महाबळे, माजी सरपंच समीर महाबळे, राजेश सानप, राजेश्री सानप, नारायण बाकडे, हरि मोरे, अनंत सानप, लक्ष्मण बाकडे, पांडुरंग महाबळे, तुकाराम कडव, नामदेव किजबिले, तसेच संभे, पाले बु., पाले खुर्द येथील ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष पांडुरंग सानप यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.






