| नवी दिल्ली | प्रतिनिधी |
आयपीएलच्या इतिहासात असे प्रथमच घडले, जेव्हा दोन सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध खेळण्यासाठी कर्णधार म्हणून मैदानात उतरले. या लीगमध्ये यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. या स्पर्धेत जरी दोन सख्खे भाऊ खेळाडू म्हणून एकमेकांविरुद्ध नक्कीच खेळले असले, तरी कर्णधार म्हणून हे प्रथमच घडले आहे. लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद कृणाल पांड्याकडे, तर दुसरीकडे गुजरात टायटन्सची कमान हार्दिकच्या हाती आहे. नाणेफेकीदरम्यान हार्दिक पांड्या म्हणाला की, हा माझ्यासाठी खूप भावनिक दिवस आहे. आमच्या वडिलांना आम्हा दोघांचा अभिमान वाटतं असेल.