जीएसटी कार्यालयानंतर आता पीएफ कार्यालयाची नोटीस
। बीड । वृत्तसंस्था ।
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं नाव चर्चेत होते. परंतु भाजपमध्ये येऊन 24 तासही उलटले नसताना काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि पंकजा मुंडेंच्या नशिबी पुन्हा उपेक्षाच आली. त्यात आता पंकजा मुंडेंसमोर नव्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.
वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा मागच्या अनेक महिन्यांपासून पाण्याची कमतरता, दुष्काळ या सोबतच वेगवेगळ्या कारणांमुळे बंद आहे. काही दिवसांपूर्वी या कारखान्याला 19 कोटी रुपयांच्या साखरेवरील जीएसटी न भरल्याने नोटीस देण्यात आली होती. यातच आता बंद असलेल्या पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या 61 लाख 47 हजार रुपये थकीत पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे न भरल्याने जीएसटी कार्यालयानंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) कार्यालयानेसुद्धा नोटीस बजावली आहे.