| रसायनी | वार्ताहर |
रसायनीतील जेष्ठ समाजसेवक प्रकाश ग्यानोजी गायकवाड यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार (दि. 5) रोजी मोहोपाडा प्रवेशव्दाराजवळच्या पोलिस चौकीसमोर थंडगार पाणपोईंची व्यवस्था करण्यात आली. रसायनी परिसरातील महत्वाची बाजारपेठ असणा-या मोहोपाडा शहरात पाणपोईची व्यवस्था नसल्याने नागरिकांना पिण्याचे पाणी दुकानातून विकत घ्यावे लागत आहे. हि समस्या त्याच्या लक्षात घेऊन पाणपोई सुरू केली आहे. या उदघाटनास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्वनाथ बप्पाजी खेडकर, प्रविण खंडागळे, दिपक इंगळे, महादेव कांबळे, अविनाश कांबळे, सुनिल निकाडे, गणेश जावळे, शिवाजी कावडे, मोहन कांबळे, दत्ता कांबळे, महेंद्र जाधव, अजीत कडलक, मुसलीघर साळवे, दयानंद सरोदे, इंद्राज कांबळे, राजू साळवे, रवि चितळे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.