कोकण विभागात पटकावला सहावा क्रमांक
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प 2023-24 या वर्षाच्या क्रमवारीत राज्यातून पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती 111 व्या क्रमांकावर आली असून, कोकण विभागात सहावा क्रमांक तर रायगड जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आली आहे.
राज्यात जागतिक बँक अर्थसहाय्यीत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प अंतर्गत बाजार समिती यांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी 2021-22 पासून पणन संचालनालयामार्फत प्रसिद्ध करण्यात येते. राज्यातील 305 बाजार समितीची 2023-24 या वर्षाची वार्षिक क्रमवारी पणन संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्याद्वारे जाहीर करण्यात आली. या गुणांकनात पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीला पायाभूत सुविधा व इतर सेवा सुविधा, आर्थिक निकष, वैधानिक कामकाज, इतर निकषांमध्ये चांगले गुण प्राप्त झाले आहेत. भविष्यात बाजार समित्यांसमोर मोठी स्पर्धा व आव्हाने उभे राहणार आहेत. आव्हाने व स्पर्धा लक्षात घेता समितीच्या कामकाजात आणखी काय सुधारणा करता येईल याबाबत संचालक मंडळ विचार करत आहे. या क्रमांकामुळे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे विविध स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.