| पनवेल | वार्ताहर |
शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात अपेक्षित असलेल्या महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणूक संदर्भात 188 पनवेल विधानसभा क्षेत्रातील आढावा घेण्यासाठी आज सोमवार दि 23 सप्टेंबर 2024 रोजी काँग्रेस भवन पनवेल येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी मा. श्री बी. एम. संदीप साहेब यांच्या उपस्थितीत आढावा घेऊन व मार्गदर्शन करून बैठक संपन्न झाली. या बैठकीस पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, पनवेल शहर जिल्हा युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, जेष्ठ नेते शशिकांत बांदोडकर, कार्याध्यक्ष, श्रुती म्हात्रे, नौफील सय्यद, मल्लिनाथ गायकवाड, शशिकला सिंग, जयश्री खटकाले, भारती जळगावकर, सुधीर मोरे, कांतीभाई गंगर प्रीतेश साहू, लतीफ शेख, जोस जेम्स, राहुल जनारोकर, जयेश लोखंडे, जयवंत देशमुख, राकेश चव्हाण, सागर पगारे, राहुल सावंत, सुरज नरुटे, सिमोन सातपुते, रमेश राव, राकेश जाधव, ताहीर खामकर, चेतन म्हात्रे, शाहीद मुल्ला व आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.