घरफोड्या करणारे सराईत चोरटे गजाआड

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल परिसरासह नवी मुंबई व ठाणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पनवेल शहर पोलिसांनी घरफोडीचा प्रयत्न करताना पकडले. त्यांच्याकडून नंबर प्लेट नसलेल्या मोटरसायकलसह मोबाईल, कटर, पट्टीपांना व स्क्रू ड्राइवर हस्तगत केले आहे.

आरोपी दत्तात्रय गोडसे (24), रा. सांगोला व त्याचा सहकारी सचिन चौहान (21) रा. खेड हे दोघेजण करंजाडे भागामध्ये संशयितरित्या फिरत असताना पोलीस शिपाई साईनाथ मोकळ यांना दिसले. त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण, पोना रवींद्र पारधी, पोना शशिकांत काकडे आदींच्या मदतीने संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडे 51,500 रुपयांची विना नंबरची पल्सर मोटारसायकल, मोबाईल, कटर, पट्टीपांना व स्क्रू ड्राइवर आढळून आले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आहे.

Exit mobile version