सराईत दुचाकी चोराला अटक

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल परिसरात दुचाकी चोरणार्‍या सराईत गुन्हेगाराला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली. तसेच, त्याच्याकडील चोरीच्या दोन दुचाकीही हस्तगत केल्या आहेत.

मोहिम लालवाणी यांची दुचाकी कर्नाळा भाजी मार्केट परिसरात उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात त्यांनी केली होती. या तक्रारीच्या आधारे वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. विनोद लभडे, पो.हवा. अविनाश गंथडे, नितीन वाघमारे, महेंद्र वायकर, विनोद देशमुख, परेश म्हात्रे, योगेश दिवेकर, पो.ना.सम्राट डाकी, पो.शि. चंद्रशेखर चौधरी आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराद्वारे आरोपीचा शोध सुरू केला. यात त्यांना आरोपी अजयकुमार कौल (वय 30, रा.करंजाडे) याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता त्याने चोरलेल्या 50 हजार रुपये किंमतीच्या दोन दुचाकी वाहने पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

Exit mobile version