वाहनचालक त्रस्त, प्रशासनाकडे उपाययोजनेची मागणी
| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल आणि पनवेलला जोडणाऱ्या भुयारी मार्गात मुसळधार पावसामुळे पाणी साचले असून, वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पनवेल-कर्जत रेल्वे मार्ग व कॉरिडोरसाठी उभारण्यात आलेल्या नवीन पुलाच्या भिंतींमधून पाणी जोरात झिरपून धबधब्यासारखे वाहात आहे. सततचा पाऊस व पाण्याचा प्रचंड वेग यामुळे वाहनांची हालचाल मंदावली असून, वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक व वाहनचालक त्रस्त असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. स्थानिक प्रशासन व रेल्वे विभागाकडे लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली जात आहे.







