पनवेल पोलिसांचा कारवाईचा बडगा

139 मद्यपी वाहन चालकांची उतरविली झिंग

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

नवीन वर्षाच्या स्वागताला मद्यपान करून वाहन चालवणार्‍या 139 वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. नवीन वर्षाच्या स्वागताला मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. या जल्लोषादरम्यान अनेक जण मद्यपान करतात आणि त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होतात. त्यात अनेक जणांना गंभीर दुखापत होते, तर कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागतो. याला आळा घालण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये आणि अपघात कमी व्हावे यासाठी वाहतूक पोलिसांतर्फे महामार्गावर विशेष पथके तैनात पथके तैनात करण्यात आली होती.

वाहतूक विभागाकडून महामार्ग तसेच शहराच्या विविध भागात नाकाबंदी करण्यात आली होती. सायंकाळी आठ ते पहाटे पाच दरम्यान करण्यात आलेल्या नाकाबंदी प्रसंगी दुचाकी आणि चार चाकी अशा जवळपास 139 वाहन चालकांनी मद्यपान केल्याचे आढळून आल्याने अशा वाहन चालका विरोधात कलम 185 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मध्ये महापे वाहतूक विभागाने सर्वात जास्त 17 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे.

वाशी 6, एपीएमसी 9, रबाळे 6, महापे 17, कोपरखैरणे 1, तुर्भे, 14, सीवूड 1, सीबीडी 5, खारघर-11, कळंबोली 13, तळोजा 12, पनवेल 10, न.पनवेल 3, उरण 5, न्हावा शेवा -16, गव्हाण 10 येथे कारवाई करण्यात आली.

Exit mobile version