पनवेल श्रीरामजन्मोत्सव सोहळा उत्साहात

| पनवेल | वार्ताहर |
रामनवमीच्या निमित्ताने रविवारी पनवेलच्या चांद्रसेनीय कायस्थ प्रभु समाजाच्या वतीने श्रीराम जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महिला मंडळाच्या वतीने वैशाली कुलकर्णी, नीलिमा वैद्य, वैशाली वैद्य, उज्वल दिघे, प्रतिभा हजरनीस, सानिका पत्की, गौरी राजे, नीलिमा गडकरी व त्यांच्या सहकार्‍यांनी सुश्राव्य गीते सादर केली. संस्थेच्या नवीन कुमार, रुचिता सिन्हा आणि विजय सिन्हा यांनी प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन चंद्रसेनिय कायस्था प्रभू समाज,पनवेल यांचा गौरव केला. यावेळी अध्यक्ष योगेश राजे, सुप्रसिद्ध उद्योजक राजुशेठ गुप्ते, उपाध्यक्ष नितीन देशमुख, सचिव गिरीश गडकरी, खजिनदार श्रीकृष्ण चित्रे, सहसचिव संदीप देशमुख, सुप्रसिद्ध उद्योजक राजाभाऊ गुप्ते, प्रदीप गुप्ते आदी मान्यवर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version