| उरण | प्रतिनिधी |
पनवेल एसटी आगारातून राज्यातील कानाकोपऱ्यात एसटीची बस जाते, त्यामुळे हे एसटी आगार राज्याचे महत्त्वाचे एसटी बस आगार म्हणून ओळखले जात आहे. मात्र, राज्य शासनाच्या ढिसाळ कारभारामुळे या आगाराला अनेक समस्यांनी वेढले आहे. आजतागायत पनवेल बस आगाराच्या कामाला मुहूर्त मिळत नाही. त्यामुळे सूरतच्या धर्तीवर केव्हा उभारले जाणार पनवेलचे बस आगार असा सवाल संतप्त प्रवाशांकडून विचारला जात आहे.
पनवेल हे सिडको कार्यक्षेत्रामधील एकमेव राज्यातील बस आगार आहे. या बस आगारातून राज्यातील कानाकोपऱ्यात एसटीची बस जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशी नागरिकांची रेलचेल सुरू असते. मात्र, या आगारात तुंबलेली गटारे, स्वच्छतेचा अभाव, अशा ऐकणा अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले सदरचे बस आगार म्हणून ओळखले जात आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. पावसाळ्यात डेपो खड्डेमय होत असतो. अशातच आगारातून वेळेवर बस सोडल्या जात नाहीत. यावेळी प्रवाशी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुजरातमधील सुरत बस डेपोच्या धर्तीवर अद्ययावत पनवेल एसटी आगार बनविण्यासाठी आपले लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पनवेल एसटी आगार समस्यांच्या विळख्यात
