पनवेल तालुका कार्यकारी चिटणीसपदी विलास फडके

। पनवेल । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाचे माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके यांची पनवेल विधानसभा क्षेत्र (ग्रामीण) कार्यकारी तालुका चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी त्यांचे अभिनंदन माजी आ. बाळाराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण शेठ घरत, पनवेल तालुका चिटणीस राजेश केणी, जितेंद्र म्हात्रे आदींनी केले.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पनवेल ग्रामीण विभागामधून रायगड जिल्हा परिषदेचे स्वीकृत सदस्य विलास फडके यांनी भाजपचा रथ रोखत या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे महाविकास आघाडीचे काम केले. या त्यांच्या कार्याची नोंद शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाने घेतली. यामुळे येणार्‍या विधानसभा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी अजून जोमाने काम करावे, यासाठी त्यांची पनवेल विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण विभागासाठी कार्यकारी चिटणीस या पदावर निवड करण्यात आली आहे.

Exit mobile version