पनवेल संघ चॅम्पियनचा किकबॉक्सिंग स्पर्धेत ऐतिहासिक विजय

तब्बल 30 सुवर्णपदकांची कमाई
| रसायनी | वार्ताहर |
राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा शिर्डी-अहमदनगर येथील सिल्वर ओक लॉन्स येथे आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातील 26 हून अधिक जिल्ह्यांतून 700 पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदविला. सर्व जिल्ह्यांना मागे टाकत पनवेल महानगरपालिका टीमने 30 सुवर्ण, 13 रौप्य आणि 16 प्राप्त करून पनवेल महानगरपालिका प्रथम क्रमांकाची चॅम्पियन चषक पटकाविला. पनवेलला हजारो वर्षांचा शिवकालीन ऐतिहासिक वारसा आहे, तो जपत खेळाडूंनी तब्बल 59 पदकांची कमाई केली आहे. त्यामुळे त्यांच्या या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पनवेल महानगरपालिका टीमचे प्रेसिडेंट जयेश चोगले, वाईस प्रेसिडेंट भूपेंद्र गायकवाड, संतोष मोकल यांनी खेळाडूंना प्रशिक्षण व केले.

तसेच सीकेटी कॉलेज खांदा कॉलोनी प्राचार्य मा. डॉ. एस. के. पाटील सर, फिजिकल डायरेक्टर मा. व्ही. बी. नाईक सर तसेच विशेष म्हणजे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव मा. डॉ. एस. टी. गडदे सर यांचे पाठबळ मार्गदर्शन व साथ सहयोग अतिशय मोलाचा ठरला.विजियी खेळाडूची नावे खालील प्रमाणे आहेत. काँटेक्ट प्रकारात धनेशा शिंगोटे,शिवानी नांगरे,आयुष कांबळे यांनी सुवर्ण, आदित्य खंडिझोड, गोवर्धन पुजारी, सूरज गायकवाड, ओम कोठावले, मीत पाटील यांनी रौप्य, भारती चव्हाण, रूद्र म्हात्रे, यशराज चव्हाण, मयूरी पिसे यांनी कांस्यपदक पटकाविले. पॉइंट फाइट प्रकारात केदार खांबे सुवर्ण, अद्विका वाघमारे, व्योमा वाघमारे यांनी कांस्यपदक पटकाविले. तलभाग प्रकारात सोहम कोठावले, सार्थक यश खुसपे, मनस्वी पाटील, राज शितोळे, यश मोरे, साईराज शिवथरे, अर्णव नींबरे, अभिज्ञ गमरे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version