हरवलेली बॅग, मौल्यवान वस्तू मिळाल्या परत
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे हरवलेली बॅग व मौल्यवान वस्तू परत मिळाल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. पनवेल शहर वाहतूक विभागात पनवेल रेल्वे स्टेशन (पश्चिम) परिसरात भाईंदर येथील रिंकू प्रजापति करंजाडे येथे त्यांच्या नातेवाईकाकडे आल्या होत्या. दरम्यान, त्यांची बॅग व त्यातील मौल्यवान वस्तू रिक्षामध्ये गहाळ झाल्या होत्या. रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालकाचा शोध घेतला व विचारपूस केली; परंतु तो मिळून आला नाही. याबाबत त्यांनी पनवेल शहर वाहतूक विभागात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासात तत्परता दाखवत रिक्षाचालकाला शोधून काढत हरवलेली बॅग व मौल्यवान वस्तू त्यांच्या ताब्यात दिल्या. या कारवाईमुळे पनवेल शहर वाहतूक पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पनवेल शहर वाहतूक) औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेरखाने, पो. हवा. युवराज येळे, पो. हवा. आमीर मुलाणी आदींनी शोधकार्यात मदत केली.







