पनवेलचा पाणीपुरवठा बंद

। पनवेल । वार्ताहर ।

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पनवेल शहराला होणारा पाणीपुरवठा सोमवारी 24 तासासाठी बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

पनवेल शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा सोमवारी (दि.9) सकाळी 9 ते मंगळवारी (दि.10) सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. यादरम्यान सोमवारी हरिओम नगर, ठाणानाका, एचओसी, मार्केट यार्ड येथील जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा सुरु राहणार आहे. तर इतर ठिकाणी बंद राहणार आहे. तसेच, मंगळवारी गंगाराम सिनेमा, भाजी मार्केट, सर्व्हिस हौद, पटेल मोहल्ला येथील जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा सुरु राहणार आहे. तर इतर ठिकाणी बंद राहणार आहे. तरी पनवेल शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेने केले आहे.

Exit mobile version