पनवेलकरांनी अनुभवला प्रिमीयर लीगचा थरार

| पनवेल | प्रतिनिधी |

आयपीएल टी-20 च्या धर्तीवर पनवेलमध्ये प्रिमीअर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल मनपाचे माजी विरोधी पक्षनेते आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे अध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांच्या पुढाकाराने श्रेया स्पोर्ट्स कोपर कै.नितीन नाईक स्मृती आयोजित ग.च.च पनवेल प्रिमियर लिगचे आयोजन कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी, पनवेल येथे दि.19 मार्च ते 1 एप्रिल दरम्यान करण्यात आले होते.

स्पर्धेचे उद्घाटन प्रीतम म्हात्रे यांच्या हस्ते झाले. वेगवेगळ्या दहा संघांनी या लीगमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा अंतिम सामना श्री समर्थ करंजाडे व नितीन स्मृती श्रेया स्पोर्टस कोपर या दोन्ही संघांमध्ये रंगला. यात श्री समर्थ करंजाडे संघाने प्रथम क्रमांक 2,00,000 पारितोषिक आणि चषक पटकावले.

चेतन म्हात्रे, विपुल म्हात्रे यांच्या हस्ते विजयी संघाचे सत्कार करण्यात आले. बक्षीस समारंभाच्या वेळी गणेश कड़ू, राजेश हातमोडे, डॉ.संतोष जाधव, नंदराज मूंगाजी, मंगेश शेलार, सतीश म्हात्रे उपस्थित होते. सदर सामन्यादरम्यान उद्योजक मुकुंद म्हात्रे, किरण खानावकर, संजय पाटील, पी. डी. भोईर, मयूर भोईर, दयाल पवार, शशिकांत भोईर, संतोष दमडे, राकेश गायकवाड, संतोष पाटील, सचिन घरत, अजयशेठ पाटील, अनुज जितेकर, गजानन पाटील, समीर म्हात्रे, मिथुन पाटील, दत्ता मुंगाजी, रतन खरोल, अविनाश नाईक, जिगर करावकर, आदित्य प्रिया, दिनेश गायकवाड, दिनेश शेलार, हेमंत दरे आणि क्रिकेट रसिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Exit mobile version