प्रीतम म्हात्रे यांचे आवाहन
| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात आठवड्यातील एक दिवस पाणीपुरठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाण्याचे योग्य नियोजन करावे, त्यासाठी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पनवेलकरांना केले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना पुढील वर्षी जूनमध्ये पाऊस पडेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करता यावा यासाठी पनवेल महानगरपालिकेने 12 डिसेंबरपासून पाण्याचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस प्रत्येक भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तरी नागरिकांना विनंती आहे की मिळणारे पाणी जपून वापरावे. तसेच, आपल्या परिसरात कुठेही पाण्याची नासाडी होत असल्याचे लक्षात आल्यास पनवेल महानगरपालिकेशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी पनवेल करांना केले आहे.