पनवेलची चिमुकली महाराष्ट्राच्या संघात

तुर्या नाईकची नॅशनल चॅम्पियनशिपसाठी निवड


| पनवेल | प्रतिनिधी |

रोलर ॲथलेटिक्स महाराष्ट्र स्टेट स्केटिंग चॅम्पियनशीप 2023 नुकतीच खोपोली येथे पार पडली. या स्पर्धेत पनवेलमधील रोलर स्केटिंग खेळाडू तुर्या नाईक हिची नॅशनल चॅम्पियनशिप 2023 मध्ये महाराष्ट्राच्या संघात निवड झाली असून, लवकरच ती राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. तुर्या हिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.

पनवेलमधील टी 75 रोलर स्केटिंग क्लबची खेळाडू तूर्या नाईक हिने चार वर्षांखालील गटामध्ये दोन कांस्यपदक पटकावून पनवेलचे नाव पुन्हा एकदा उंचावले आहे. तूर्याला प्रशिक्षक रायगड भूषण आणि महाराष्ट्र संघाचे कर्णधार प्रसाद ढवळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तुर्याच्या यशात आजोबा प्रल्हाद नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. तुर्याचे वय अवघे चार वर्ष असून, ती अडीच वर्षांपासून स्केटिंगचे प्रशिक्षण घेत आहे.

Exit mobile version