जनता शिक्षण मंडळातर्फे अलिबाग येथे पॅरामेडिकल कोर्सेस

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग येथील जनता शिक्षण मंडळातर्फे जून २०२२ पासून पॅरामेडिकल कोर्सेस सुरु करण्यात येणार आहेत. दि. २१ मे रोजी जे. एस. एम. कॉलेज येथे जनता शिक्षण मंडळ व एस. पी. मोरे कॉलेज ऑफ पॅरामेडिकल एजुकेशन, पनवेल यांच्यामध्ये संबंधीचा सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी जनता शिक्षण मंडळाच्या उपाध्यक्ष डॉ. साक्षी पाटील जे. एस. एम. कॉलेजचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, जनता शिक्षण, बॉटनी विभागच्या प्रधापीका डॉ. मिनल पाटील, इंडियन मेडीकल असोसियेशन अलिबागचे अध्यक्ष डॉ. विनायक पाटील, डॉ. तेजश्री नाईक, जनता शिक्षण मंडळाचे मानद चिटणीस, मिलिंद पाटील, एस. पी. मोरे कॉलेजचे जनसंपर्क अधिकारी अनिल मखमले कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक एस. एस. केदार प्रा. ए. व्ही. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. अलिबाग व परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सहज नोकरीचा पर्याय उपलब्ध करून देणारे कोर्स सुरु होत असल्याने १० वी व १२ वी पास उत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल अशी माहिती जनता शिक्षण मंडळचे अध्यक्ष ऍड. गौतम पाटील यांनी दिली.

एस. पी. मोरे कॉलेजच्या सहकार्याने दोन वर्षांचा डी. एम. एल. टी. कोर्स एक वर्षाचा एम. एल. टी कोर्स, एक वर्षांचा नर्सिंग केअर कोर्स व एक वर्षांचा डेंटल ऑपरेटिंग रूम असिस्टंट असे चार कोर्स जून २०२२ पासून सुरु केले जातील अशी माहिती प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी दिली. पदवीचे शिक्षणघेत असतानाच हे कोर्सेस शनिवारी व रविवारी करण्याची संधी विधार्थाना मिळणार आहे. महाविद्यालयातील प्रधापीका मयुरी पाटील यांची नेमणूक या पॅरामेडिकल कोर्स च्या समन्वयक म्हणून केली असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. १० वी १२ वी परीक्षांचे निकाल लागल्यानंतर सर्व कोर्ससाठी प्रवेश सुरु केले जातील असे मयुरी पाटील यांनी या वेळी सांगितले. अधिक माहितीसाठी ८९७५१०९३६० या भ्रमणध्वनीवर विद्यार्थी व पालकांनी संपर्क साधावा.

या विभागातील विद्यार्थांना १० वी १२ वी पूर्ण केल्यानंतर वैद्यकिय संस्था, दवाखाने या मध्ये हे कोर्स केल्यानंतर नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

– डॉ. विनायक पाटील, अध्यक्ष, इंडियन मेडीकल असोसियेशन अलिबाग

दंत वैद्य व इतर वैद्यकिय व्यवसायीकांसाठी प्रशिक्षित कुशल सहाय्यक हे कोर्स पूर्ण केल्या नंतर उपलब्ध होतील.

– डॉ. तेजश्री विलास नाईक, दंत वैद्यक, अलिबाग
Exit mobile version