पालक शाळेच्या विरोधात

| नेरळ | प्रतिनिधी  |
शाळेची फी भरली नाही म्हणून नेरळ येथील एलएईस शाळेतील 200 विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे. याबाबत कर्जत पंचयाय समितीच्या शिक्षण विभागाकडे दाद मागणार्‍या या शाळेच्या पालकांना कोणताही दिलासा मिळाला नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

नेरळ येथील लॉर्ड अय्यपा इंग्लिश स्कूल या शाळा व्यवस्थापणेकडून घडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या शाळेची पालकवर्गाने फी भरली नसल्याने 200 हुन अधिक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणापासून वंचित ठेवले आहे. तर काही विद्यार्थ्यांना मागील वर्गातून पुढील वर्गात घातलेच न गेल्याचे विद्यार्थ्यांचे पालकवर्ग सांगत आहे.शासन एकीकडे कुठलाही विध्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये असे सांगत आहे तर दुसरीकडे फी भरली जात नसल्याने शाळा व्यवस्थापनाकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीत सामावून घेतले जात नसल्याचे समोर येत आहे.त्यामुळे शाळा व्यवस्थापनाकडून मनमानी कारभार चालवल्याचे समोर दिसत आहे.यावेळी नुकताच राज्यसरकार कडून घेण्यात आलेल्या शाळेच्या 15 टक्के फी कपातीवर देखील पालकवर्गाने आपली नाराजी व्यक्त केली आहे.परंतु कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो त्यात या तालुक्यात नोकरदार वर्ग जास्त प्रमाणात असल्याने सध्या कोरोनामुळे सारेच अडचणीत सापडल्याने विद्यार्थ्यांवर होणार्‍या अन्याय विरोधात आता कोण पुढे येणार हा देखील महत्वाचा प्रश्‍न समोर आला. याबाबत कर्जत पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी सुरेखा हिरवे तसेच शाळा व्यवस्थापणेशी संपर्क साधला असता तो होऊ शकलेला नाही.

कोरोना मुळे सर्वांची आर्थिक गणित बिघडली असून अनेक पालकांना आपल्या मुलांच्या शाळेची फी देखील भरता येत नाही.नेरळ येथील एलएईएस शाळेने फी भरली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणे बंद केले आहे.त्याबद्दल पालकवर्गाने शाळा व्यवस्थापनाकडे धाव घेतली होती.परंतु काही मार्ग निघत नसल्याने पालकवर्गाने गटशिक्षण अधिकार्‍यांकडे आपली व्यथा मांडली होती.त्यातच आता 23 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा सुरू होत आहेत.त्यामुळे फी न भरणार्‍या विद्यार्थ्यांना परीक्षेत बसता येईल का?हा प्रश्‍न सध्यातरी अनुत्तरित आहे.

Exit mobile version