पालक सदृढ बालक अभियान सुरू

| पनवेल । प्रतनिधी ।
शासनाच्यावतीने शुक्रवारी जागरूक पालक सदृढ बालकफ अभियानास सूरूवात झाली आहे. यामध्ये 0-18 वयोगटातील मुलांची तपासणी केली जाणार आहे. हे अभियान मुलांप्रमाणेच पालकांपर्यंत पोहचण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला पाहिजे. येणार्‍या काळात महापालिकेची नऊ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू होणार आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्राचा माध्यमातून हजारो नागरिकांना फायदा होणार.

प्रत्येक विद्यार्थी सुदृढ, निरोगी राहावा, यासाठी आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य् अभियान मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनूसार शुक्रवारपासून पुढील आठ आठवडे जागरूक पालक सदृढ बालक अभियानांतर्गत 0 ते 18 वयोगटातील महानगरपालिका क्षेत्रातील बालकांची -किशोरवयीन मुला-मुलींची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन गावदेवी मंदिराजवळील महानगरपालिकेच्या लोकनेते पाटील विद्यालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृष्य् प्रणालीच्या माध्यमातून केले.

यावेळी आयुक्त गणेश देशमुख, तहसिलदार विजय तळेकर, विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक मधुकर पांचाळ, जाहिद शेख, प्रथमेश सोमण, अनिल भगत, नितीन पाटील, रेहाना मुजावर, किर्ती महाजन,राष्ट्रीय बाल सुरक्षा अभियानाचे पाच वैद्यकिय अधिकारी, मुख्यालय वैद्यकिय अधिकारी,शिक्षिका, शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version