स्वच्छतेसाठी पालक एकवटले

पेण एज्युकेशनच्या प्राथमिक शाळेचा उपक्रम

| खरोशी | वार्ताहर |

स्वच्छता हा आरोग्याचा मूलमंत्र आहे तसेच स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उद्देशानुसार आपली शाळा, आपला वर्ग व परिसर स्वच्छ असावा याकरिता पेण एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा पेण येथे स्वच्छता अभियान मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेस पालकांनी मोलाचे सहकार्य करून उपक्रमास उदंड प्रतिसाद दिला.

मुख्याध्यापिका लेखा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शाळा व्यवस्थापन संघाचे उपाध्यक्ष संदेश कुडपाने व शिक्षक पालक संघाच्या उपाध्यक्षा आरती विजय गावंड यांच्या मार्गदर्शनाने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्य सुषमा भोईर, मेघनाथ पाटील, अंकिता जांभळे, समिक्षा पाटील, राधा पाटील, करिष्मा म्हात्रे, नामदेव गायकर, लंकेश पार्टे त्याचबरोबर शिक्षक पालक संघाचे सदस्य संदीप काईनकर, वैभव गायकर, मृणाली खोपडे, जान्हवी जोशी, हेमलता म्हात्रे, नाजनीन कागदी, संपदा म्हात्रे, सुवर्णा म्हात्रे, मेघा पाटील, माधुरी बांदल, दत्ता शेडगे यांच्यासह संदीप कदम व सर्व वर्गांचे पालक तसेच शिक्षक वर्ग स्काऊट गाईडचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी स्वच्छता अभियान कार्यक्रम राबवून शालेय परिसर व रस्त्यावरील केरकचरा काढून परिसर चकाचक केला.

Exit mobile version