एक महिला जखमी
पनवेल | वार्ताहर |
कळंबोलीत इमारतीच्या छताचा काही भाग कोसळून एका महिला जखमी झाली आहे. डोक्याला मार लागला असून तीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती नगरसेवक गोपाळ भगत व नगरसेविका प्रिया भोईर यांनी दिली.
कळंबोलीसह, खारघर, नविन पनवेल, खांदा कॉलनी आदी ठिकाणी सिडकोचे निकृष्ट दर्जाची बांधकामे झाली आहेत. असा जुन्या-जर्जर, धोकादायक इमारतींचे स्लाप कोसळण्याच्या घटना वारंवार होत आहेत.यात अनेक जन गंभीर जखमी झाले आहेत. या गंभीर समस्येवर सिडको प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे , सिडकोवर मोर्चे काढले, स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणे साठी रास्ता रोको आंदोलन केले, या जुन्या जर्जर इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येवून त्या धोकादायक राहण्यास लायक नसल्याचे सिडकोने इमारती व दरवाजांवर फलक लावले आहेत. मग सिडको या जुन्या जर्जर इमारतीचा पुनर्विकासाचा तोडगा काढणार कधी? रहिवासीचे जीव घेण्याची वाट पहात आहे का? असा संतप्त प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. कळंबोली सेक्टर 5 बी, 10/1-4 अष्टविनायक सोसायटी येथे राहात असलेल्या वनिता नारायण यादव या कामावरून आल्यानंतर आराम करत असताना इमारतीच्या छताचा भाग त्याच्या डोक्यावर पडून त्या जखमी झाल्या आहेत. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांच्या डोक्याला सहा टाके पडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक गोपाळ भगत व नगरसेविका प्रिया भोईर यांनी घटना स्थळी जावून प्रथम जखमी महिलेला हाँस्पिटलमध्ये दाखल करून नंतर सिडको प्रशासनाला यांची माहिती दिली.