पोस्ट ऑफिसच्या टीमचा रायगड किल्ला प्रदक्षिणेत सहभाग

| रायगड | प्रतिनिधी |

यंग फाऊंडेशन महाड यांच्यातर्फे दरवर्षी रायगड किल्ला प्रदक्षिणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार यावर्षीच्या रायगड किल्ला प्रदक्षिणेत जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड सोमनाथ घार्गे व डाक अधीक्षक सुनील थळकर सहभागी झाले हे सर्व स्पर्धकांसाठी विशेष होते. वर्षातून एकवेळच यंग फाउंडेशन महाड यांच्यातर्फे आयोजित केली जाणारी रायगड किल्ल्याची प्रदक्षिणा हा अनुभव नियमित ट्रेकरच्या पेक्षाही अनुभव नसणाऱ्या नवागतानसाठी नक्कीच साहसपूर्ण, चालणाऱ्याचा कस काढणारा, दमछाक करणारा आहे. या प्रदक्षिणेतील शेवटचे दोन टप्पे तर निसरड्यावाटेमुळे नक्कीच सावधानतेचा वेगळा अनुभव देणारा होता. यात स्थानिक बाहेरून आलेल्या पर्यटकांचे लक्ष वेधले होते.

रायगड पोलिस विभाग आणि रायगड डाक विभागांनी या मोहीमेत सहभाग नोंदवला होता. रायगड डाक अधीक्षक सुनील थळकर यांनी सहभागी होत प्रोसाहित केल्याने त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत रायगड डाक विभागातर्फे 24 शिलेदारानी या प्रदक्षिणेत भाग घेतला. त्यात पोस्टमास्टर गजेंद्र भुसाणे, चंदन कुमार, प्रवीण साळुके, समीर म्हात्रे, प्रसाद फडके, रवींद्र घरत, मनोज अंबुरे, नागेश साखरकर, अनिल नाईक, संतोष चिपळूणकर, मयूर भोईलकर, विशाल पाटील, परेश राऊत, नितीन पाडोळे, विनय पाटील, क्षितिज पाटील, महावीर नेटके, नीलेश राणे, उमेश राणे, सुबोध राणे यांनी ही परिक्रमा पूर्ण केली.

Exit mobile version