कार्यकर्त्यांनी हाती धरला लाल बावटा
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील कळंब ग्रामपंचायत मध्ये असलेल्या मिरचुलवाडी येथील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. त्यामुळे शेकाप सोडून शिवसेनेत गेलेल्या नेत्याला जोरदार चपराक बसली आहे.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. कर्जत तालुक्यातील शेकापचे नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे माजी सभापती नारायण डामसे,माजी सरपंच कृष्णा बदे, रेवता ढोले, ग्रामपंचायत सदस्य नीलम ढोले आणि पक्षाचे विभागीय चिटणीस पांडुरंग बदे यांच्या नेतृत्वाखाली कळंब ग्रामपंचायत मधील मिरचुलवाडी येथील शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी शेकाप पक्षात प्रवेश करून शेकापचा लाल बावटा हाती घेतला.
यावेळी कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती जयवंती हिंदोळा, शेकापचे जिल्हा अनुसूचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष बबन भालेराव, शेकापचे जेष्ठ कार्यक्रर्ते सुलतान कुरेशी, भरत ऐनकर, नारायण मोरे, गणेश मानकामे, सुनिल बदे, पोशिर ग्रामपंचायत सदस्य सदस्य दत्ता राणे, पुरोगामी संघटना उपाध्यक्ष महेश म्हसे, कशेळे ग्रामपंचायतचे उपसरपंच आदित्य गायकवाड, युवक तालुका उपाध्यक्ष मंगेश खेडेकर, गणेश म्हसे,मोग्रज ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सांबरी आदी उपस्थित होते.
कळंब ग्रामपंचायत मधील मिरचुलवाडी मधील महेश निरगुडा, हरिचंद्र ढोले, हरी ढोले, भरत दोरे, हरिचंद्र पारधी, लालू पारधी, वामन निरगुडा, गणेश पारधी,पांडुरंग निरगुडा, हनुमान आवाटे, मारूती ढोले, सोमा आवाटे, धनेश कांबडी, काशिनाथ ढोले, गणेश ढोले, बुधाजी मेंगाळ, गणपत निरगुडा, गोपाळ दोरे, भरत निरगुडा, काळुराम निरगुडा, सुनिल ढोले, काशिनाथ ढोले, जनार्दन दोरे, लक्ष्मण मेंगाळ, चंद्रकांत कडाळी, गणेश पारधी, विलास कांबडी, गणेश निरगुडा, सुनिल ढोले, सुरेश निरगुडा, करण ढोले, प्रकाश मेंगाळ, बुधाजी मेंगाळ, गणेश ढोले, किरण केवारी, गणपत निरगुडा,विलास मेंगाळ, मारूती ढोले, जनार्दन आवाटे, राजेश पारधी, तुकाराम निरगुडा, शिवाजी निरगुडा, जानू पारधी, राहूल निरगुडा, सुनिल निरगुडा, राजेश ढोले, बबन आवाटे, राम निरगुडा आदी कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला.