रिक्षा उलटल्याने प्रवासी जखमी

। पनवेल । प्रतिनिधी ।

भरधाव वेगाने रिक्षा चालवून रिक्षा अनियंत्रित होऊन पलटी झाल्याने झालेल्या अपघातात सुनील दहिफळे (27) हे प्रवासी जखमी झाले. याप्रकरणी रिक्षा चालकाविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनौल दहिफळे हे सेक्टर-27, तळोजा फेस टू येथे राहत असून, त्यांनी आरएएफ सिग्नल आल्यानंतर धानसरला जाणारी शेअरिंग रिक्षा पकडली. या वेळी रिक्षाचालक भरधाव वेगाने रिक्षा चालवत असताना, वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही रिक्षा रस्त्यावर उलटी होऊन हा अपघात झाला. या अपघातात दहिफळे रस्त्यावर पडले व रिक्षा त्यांच्या पायावर पडून ते जखमी झाले . त्यानंतर ही रिक्षा बाजूला करण्यात आल्यावर रिक्षाचालक रिक्षा घेऊन पळून गेला. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version