। नागपूर । प्रतिनिधी ।
चामोर्शीवरुन प्रवासी घेऊन बाबा नामक ट्रॅव्हल्स (एम.एच. 37 बी. 6964) ही नागपूरकडे निघाली होती. राष्ट्रीय मार्गावरील मानोरा फाटा परिसरात आले असता भरधाव ट्रॅव्हल्सच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅव्हल्स राष्ट्रीय महामार्गालगत खोदलेल्या 25 फूट नाल्यात कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, ट्रॅव्हल्समधील 32 पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले. सर्व जखमी प्रवाशांना भिवापूर व उमरेड येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास झाला.