नांदगाव बायपास रस्त्यावर धुळीचे साम्राज्य
| कोर्लई | वार्ताहर |
अलिबाग-मुरुड रस्त्यावर नांदगाव सुरुळपेठ, स्टेट बँक एटीएम ते बेंगलोर बाजारदरम्यान फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून, वाहतूक बायपास रस्त्याने वळविण्यात आली आहे. या कच्च्या रस्त्यावर वाहनांच्या वर्दळीने मोठ्या प्रमाणावर उडणारी धुळीने वाहन चालक व प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी यात लक्ष घालून रस्त्यावर टँकरने पाणी मारण्याची मागणी केली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या साळाव-मुरुड-आगरदांडा रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधीचा निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात झाली आहे. यात या रस्त्यावरील नांदगाव सुरुळपेठ स्टेट बँक एटीएम ते बेंगलोर बाजारदरम्यान रस्ता काँक्रिटीकरणाचे काम सुरू असून, वाहतूक बायपास रस्त्याने वळविण्यात आली आहे. या कच्च्या रस्त्यावर वाहनांच्या वर्दळीने मोठ्या प्रमाणावर उडणार्या धुळीने वाहनचालक व प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी यात लक्ष घालून रस्त्यावर टँकरने पाणी मारण्याची मागणी केली जात आहे.