लोकलमधून पडून प्रवासी गंभीर

| पनवेल | वार्ताहर |
लोकल गाडीतून रेल्वे पटरीच्या बाजूस पडून एक इसम गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारार्थ प्रथम उपजिल्हा रूग्णालय पनवेल व त्यानंतर जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे नेण्यात आले आहे. याबाबत त्याची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत. खांदेश्‍वर ते पनवेल रेल्वे कि.मी. नं. 46/12-13 मध्ये प्रवास करीत असताना सदर इसम हा खाली पडला आहे. त्याचे अंदाजे वय 30 वर्षे, उंची 5 फूट 5 इंच, अंगाने मध्यम, रंग गोरा, चेहरा गोल, नाक सरळ, केस काळे मध्यम, दाढीमिशी मध्यम वाढलेली व काळी आहे. अंगात लाल पांढर्‍या चौकटीचा फूल शर्ट व पाढर्‍या रंगाची जीन्स पॅन्ट त्याच्यात काळ्या रंगाची जीन्स पँट घातलेली आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल रेल्वे पोलिस ठाणे किंवा पो.हवा. शिंदे 9619666946 यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version