| पनवेल | प्रतिनिधी |
भविष्यातील वाहतुकीचे केंद्र असलेल्या पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानकासमोरील जागेची कमतरता, रिक्षाचालकांची मनमानी तसेच पायाभूत सुविधांच्याअभावामुळे स्थानकातील प्रवेश त्रासदायक झाला आहे.
मध्य रेल्वे, कोकण रेल्वे तसेच मुंबई उपनगरी मार्गावरील पनवेल महत्त्वाचे स्थानक आहे. येथून मुंबई, ठाणे, अंधेरीसह वसई-डहाणू लोकल तर कोकणमार्गावरील सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. सध्या येथे 7 फलाट असून, 4 उपनगरी तर 3 लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वापरले जाते. सिडकोने विकसित केलेल्या स्थानकात नवीन टर्मिनसचे काम सुरू असल्याने भविष्यात दादर, सीएसएमटी, एलटीटीवरील भार कमी होऊन पनवेल जंक्शनचा दर्जा अधिक मजबूत होणार आहे. परंतु, दिल्ली-जेएनपीटी कॉरिडॉरमुळे प्रत्यक्षात प्रवाशांच्या गैरसोयी वाढल्या आहेत. स्थानकाबाहेरील जागेअभावी बस, रिक्षा थांबे व्यवस्थित नसल्याने प्रवासी अडचणींचा सामना करत आहेत. पदपथांवरील अतिक्रमणांमुळे मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यास प्रवाशांची गैरसोय होत आहे.
बस डेपो ते स्थानकादरम्यानच्या पदपथांवर झोपडपट्टीधारकांची दुकाने थाटल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावर चालावे लागते. एका बाजूला अतिक्रमण, दुसऱ्या बाजूला रिक्षा उभ्या असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
औदुंबर पाटील,
पोलीस निरीक्षक, पनवेल वाहतूक शाखा







