| मुंबई | वृत्तसंस्था |
या वर्षी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. येत्या काही दिवसांत लोकसभा निवडणुकीच्या तारखा पण जाहीर केल्या जातील. या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जागावाटप करत आहेत.
यादरम्यान पश्चिम बंगालमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण 42 उमेदवारांची नावे आहेत. मात्र, या यादीत सर्वात आश्चर्यकारक नाव आहे ते म्हणजे भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणचे. मैदानात गगनचुंबी षटकार मारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या युसुफ पठाणची यावेळी राजकारणात एन्ट्री झाली आहे.
लोकसभा निवडणूक मध्ये यंदा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण बहरामपूरमधून निवडणूक लढवणार आहेत. ममता बॅनर्जी यांनी कोलकाता येथील सभेत त्याच्या नावाची घोषणा केली. टीएमसीने त्याला बहरामपूरमधून उमेदवारी दिली आहे. या जागेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी हे खासदार आहेत. अशा परिस्थितीत प्रसिद्ध क्रिकेटपटूला मैदानात उतरवून ममता बॅनर्जींनी मोठी खेळी केली आहे.
पठाण लढवणार लोकसभा
