रुग्णांना मिळणार शुद्ध पाणी

| माणगाव । वार्ताहर ।

माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याची काळजी घेत उपजिल्हा रुगणालयात येणार्‍या रुग्ण व नातेवाईकांना शुद्ध प्रक्रिया केलेले पाणी मिळणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या रुग्णालयात तालुक्यातीलच नव्हे तर महामार्गावरील प्रवासी, पर्यटक, अपघातग्रस्त तसेच महाड, खेड, मंडणगड, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आदि. भागातून विविध प्रकारचे रुग्ण उपचार व शास्त्रक्रियांसाठी येतात. त्यामुळे हे रुग्णालय सामान्य गोरगरीब रुग्णांसाठी हे वरदान ठरले आहे. या रुग्णालयात दररोज हजारो नागरिक विविध उपचारासाठी येतात. यांचा विचार करून जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. माने यांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी वर्ग त्यांचेसाठी ओझोन वॉटर फिल्ट्रीशन प्लँट किंबहुना मिनरल वॉटर प्लँट बसविला असून या प्लँटची शुध्द पाणी करण्याची क्षमता प्रति तासाला 2000 लिटर शुद्ध प्रक्रिया केलेले पाणी रुग्ण व त्यांचे नातेवाईक, कर्मचारी, नागरिकांना पिण्यासाठी सुरु झाले आहे.

हा प्लँट बसविल्यामुळे सर्व स्तरातील नागरिकांना यांचा लाभ मिळणार असून बाजारातून पाणी बाटली विकत घेण्याच्या खर्चाला आळा बसणार आहे.

मारुती मोकाशी
सरपंच कडापे ग्रामपंचायत
Exit mobile version