सर्वपक्षीय नेत्‍यांकडून पाटील कुटूंबियांचे सांत्‍वन

| अलिबाग | प्रतिनिधी |

माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटीला यांचे शुक्रवारी निधन झाले. गेल्या सहा दिवसांपासून राजकीय, सामाजिक आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून पाटील कुटूंबियांचे सांत्वन करण्यात आले. बुधवारी (दि.03) केंद्रीयमंत्री कपिल पाटीलसह काँग्रेसचे नेते, कामगार नेते भाई जगताप यांच्यासह अनेक मान्यवरांनी पेझारी येथे जाऊन शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील भेट घेऊन त्यांची विचारपूस करून सांत्वन केले.

1 / 6

मीनाक्षी पाटील यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात एक वेगळी पक्कड निर्माण केली होती. रायगडसह संपूर्ण राज्यात एक वेगळा दबदबा त्यांचा राहिला आहे. शुक्रवारी (दि.29) मीनाक्षी पाटील यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच केंद्रीय मंत्री कपिल पाटील, कामगार नेते भाई जगताप, आ. अशिष शेलार, आ. मंदा म्हात्रे, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, आ. सतेज उर्फ बंटी पाटील, महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप, विकास गोगावले, जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती नरेश पाटील, सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक प्रमोद जगताप,रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, काँग्रेसचे नेते उमेश ठाकूर, सांगोल्यातील शेकापचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, सभासद, पंचक्रोशीतील कार्यकर्ते व ग्रामस्थांनी पेझारी येथे जाऊन पाटील कुटूंबियांचे सांत्वन केले.

2 / 6

यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती तथा मीनाक्षी पाटील यांच्या स्नुषा चित्रा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्या भावना पाटील, शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमख चित्रलेखा पाटील, युवा नेते सवाई पाटील, सुमन पाटील, आदी मान्यवरांसह शेकापचे पदाधिकारी, चिटणीस मंडळाचे पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version