। म्हसळा । वार्ताहर ।
पाभरे ग्रुप ग्राम पंचायतीचे सरपंच तथा म्हसळा तालुका कोळी समाजनेते अनिल बसवत यांचे वडील आणि रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या हिरा अनिल बसवत यांचे सासरे रामचंद्र हरी बसवत यांचे दिनांक 16 सप्टेंबर रोजी पाभरे येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 81 वर्षे होते. रामचंद्र बसवत पेशाने निवृत्त शिक्षक होते. सांस्कृतिक कार्यक्रमाची त्यांना खुप आवड होती ते गाव परिसरात संगीत भजनी बुवा म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा आप्तेष्ट परिवार आहे.