माथेरान पतसंस्थेचे पवार गायकवाड तज्ज्ञ संचालक

| माथेरान | वार्ताहर |
माथेरान नागरी पतसंस्थेच्या तज्ज्ञ संचालकपदी गिरीश पवार आणि अनिल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पतसंस्थेच्या बैठकीत घोषणा करण्यात आली.तसेच पतसंस्थेचे सचिव योगेश जाधव यांनी पतसंस्थेचे काम चांगल्या पद्धतीने केल्यामुळे त्यांचा सभापती अजय सावंत व सर्व संचालक मंडळाकडून सन्मान करण्यात आला. यावेळी तीन वेळा संचालक राहिलेले विजय कदम, राजेश दळवी,विवेक चौधरी,उपसभापती विनंती घावरे,कुलदीप जाधव,मंगेश सकपाळ व अन्य संचालक मंडळी उपस्थित होती.

Exit mobile version