| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे एस.टी. स्थानकात विविध प्रकारच्या वाहन चालकांसाठी अधिकृत पे अँड पार्किंग सेवा सुरू करण्यात आली आहे. श्री आई जोगेश्वरी पे अँड पार्किंग या सेवेच्या उद्घाटनाचा छोटेखानी कार्यक्रम मंगळवारी (दि.9) करण्यात आला. या सेवेमुळे वाहन चालकांची वाहने माफक दरात सुरक्षित राहणार असल्याने नागोठणे शहर व आजूबाजूच्या परिसरातून नागोठण्यात खरेदीसाठी येणार्या नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा व सहकार्य करावे, असे आवाहन पे अँड पार्किंग सेवेचे अधिकृत परवानाधारक विपुल हेंडे यांनी केले आहे.