चक्रीवादळग्रस्तांना भरपाई द्या

। नागपूर । प्रतिनिधी ।

कोकणात दोन वर्षापूर्वी झालेल्या निसर्ग आणि तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी सरकारकडे केली आहे. गुरुवारी या मुद्यावर बोलताना त्यांनी या चक्रीवादळाने अलिबाग तालुक्यातील चौल, नागाव, रेवदंडा येथील नारळ, सुपारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यांना सरकारकडून अपेक्षित अशी नुकसान भरपाई आतापर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे या शेतकर्‍यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. यासाठी सरकारने तातजीने वादळग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी, अशी आपली आग्रही मागणी असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

याशिवाय बचत गटाच्या गट प्रवर्तकाला बिंदु नामावली मध्ये सामावून घेतले पाहिजे, अंगणवाड़ी सेविका पदवीधर आहेत मात्र त्यांना मिळणारे वेतन आणि मानधन तुटपुंजे आहेत ते वाढवून मिळावे, या करीता संबंधित मंत्र्यांनी बैठक घेऊन त्यांच्या समस्या समजावून घ्यावी अशा विविध मागण्याही त्यांनी यावेळी केल्या.

Exit mobile version