शिंदे आंबेरीतील पाझर तलाव अपूर्णच

। साडवली । वृत्तसंस्था ।

संगमेश्‍वर तालुक्यातील शिंदेआंबेरी येथे चौदा वर्षापूर्वी लाखो रुपये खर्च करून पाझर तलावाचे काम हाती घेण्यात आले; मात्र चौदा वर्षानंतरही या तलावाचे काम आजही अपूर्ण आहे. या तलावासाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या त्यांना आजतागायत त्याचा मोबदलाही मिळालेला नाही. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जितेंद्र चव्हाण आणि जिल्हाधिकार्‍यांना एक निवेदन देत कामाची चौकशी करावी. शेतकर्‍यांना तत्काळ मोबदला न मिळाल्यास त्या पाझर तलावावरच 14 ऑगस्टपासून ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिंदे आंबेरी येथे पाण्याची गरज व शेती व्यवसायाचा विचार करून शासनाच्यावतीने पाझर तलावासाठी मृद व जलसंधारण विभागाकडून 2009 ला 38 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या पाझर तलावाचे काम सुरू करण्यात आले; मात्र आजतागायत हे काम अपूर्णच आहे. या तलावासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी घेण्यात आल्या. त्यांनाही आजतागायत मोबदला मिळालेला नाही. मृद व जलसंधारण विभागाकडून शासनाच्या नियमानुसार, 14 वर्षानंतरही भूसंपादनाची कार्यवाही केली नसल्याने शेतकरी मोबदल्यापासून वंचित आहेत.

काही वर्षांपूर्वी हा पाझर तलाव फुटून तलावाच्या पायथ्याजवळ शेतीचे नुकसान झाले होते. गेली चौदा वर्षे जमिनी गेलेले शेतकरी मोबदल्याच्या प्रतिक्षेत असून संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन कामाची तत्काळ चौकशी करून कामात दिरंगाई करणार्‍यांवर कारवाई व्हावी व शेतकर्‍यांना तत्काळ मोबदला मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

चौदा वर्षे प्रतीक्षाच
चौदा वर्षानंतरही या तलावाचे काम आजही अपूर्ण आहे. या तलावासाठी ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या त्यांना आजतागायत त्याचा मोबदलाही मिळालेला नाही. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने जितेंद्र चव्हाण आणि जिल्हाधिकार्‍यांना एक निवेदन देत कामाची चौकशी करावी. शेतकर्‍यांना तत्काळ मोबदला न मिळाल्यास त्या पाझर तलावावरच 14 ऑगस्टपासून ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Exit mobile version