पुण्याचा पीबीकेजीसी ए संघ विजेता

एस आर टी.10 संघ ठरला उपविजेता

| खोपोली | प्रतिनिधी |

खोपोली क्रिकेट असोशियन आयोजित राज्यस्तरीय सीझन बॉल आमदार चषकाचे आयोजन 10 ते 19 या दरम्यान पी. जी. जाधव पटांगणावर खोपोली क्रिकेट असोसिएशनतर्फे सामने खेळवण्यात आले. या स्पर्धेची सांगता सोमवारी (दि.19) झाले. या स्पर्धेत आयपीएल व रणजीपटू खेळाडूंनी हजेरी लावली होती. त्यात प्रवीण तांबे, योगेश टाकवले हे आयपीएलचे खेळाडू तर योगेश पवार, अक्षय दरेकर, पुष्कराज चव्हाण, जय बिस्ता, सिद्धार्थ म्हात्रे, आदी रणजीचे खेळाडूनी भेट दिली.

पुण्याचा पीबीकेजी ए संघ ठरला विजेता, तर नवीन मुंबई नेरूळचा एस आर टी.10 संघ उपविजेता ठरला. अंतिम सामन्यात एसआरटी संघाने प्रथम फलंदाजी करीत 18 षटकात 94 धावा केल्या. त्याला उत्तर देताना पीबीकेजीसी ए संघाने बिनबाद 95 धावा करून चषक आपले नाव कोरले. विजेत्या संघास खोपोली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत साबळे व खोपोली पोलीस निरीक्षक शितलकुमार राऊत यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आले. स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज ऋतुराज वेलणकर 32 चेंडू 76 धावा, उत्कृष्ट गोलंदाज सागर सावंत, मालिकावीर ऋषिकेश बारणे, उत्कृष्ट यष्टीरक्षक साई चव्हाण. या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला.

या पारितोषिक वितरण पोलीस निरीक्षक शितलकुमार राऊत, विक्रम साबळे, किशोर पाटील, दिनेश थोरवे, दिलीप पोरवाल, सुनील नांदे, संजय तन्ना, अमोल जाधव, चंद्रप्पा आनीवार, अविनाश तावडे, संजय तावडे, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version