खोरा बंदर परिसरात शुकशुकाट

| मुरूड जंजिरा | वार्ताहर |
सध्या जंजिरा बंद असल्याने पर्यटक नाहीत. पावसाळ्यामुळे अन्य छोट्या-मोठ्या नौकादेखील बंदरात येत नाहीत. त्यामुळे खोरा बंदर जेट्टीवर सध्या शांतता अनुभवायला मिळते आहे. अन्य वेळी वाहनांची आणि पर्यटकांची वर्दळ सुरू असते. अधिक सोयी सुविधा केल्यासभावी काळात खोरा बंदर मुरूडच्या पर्यटन विकासात नवा मानबिंदू ठरेल यात शंकाच नाही.

दरम्यान, विकासक गौतम अदानी यांचे होत असलेले आगरदांडा-दिघी हे देशातील सर्वाधिक मोठे बंदर खोरा जेट्टीपासून अगदी जवळ आहे. जलवाहतुकीद्वारे येथे पर्यटनाला मोठा वाव मिळू शकतो. म्हणजेच, खोरा बंदराचे महत्व देखील भविष्यात वाढणारच आहे, असे दिसून येते. रोजगाराच्या नवीन संधी सर्व क्षेत्रालादेखील निर्माण होणार आहेत.

खोरा बंदराचे रूप गेल्या 3 ते 4 वर्षात पूर्णतः पालटले असून, मुरूड च्या पर्यटन विकासासातील सुंदर स्थळ बनले आहे. मेरिटाइम बोर्डाने रुंद आणि प्रशस्त जागी बसण्यासाठी बेंचेस बसविले आहेत. सायंकाळच्या वेळी शतपावली आणि फेरफटका मारण्यासाठी नागरिक येत असतात. येणार्‍या पर्यटकांनादेखील नवा लूक भावतो, समुद्राची गाज आणि उसळत्या लाटा पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात. येथून जंजिर्‍याचे विलोभनीय दर्शन होते. पर्यटकदेखील हा नजारा ‘याची देही याची डोळा’ अनुभवितात. डोंगराच्या कातळाला कापून खोरा जेट्टीकडे जाणारा मार्ग केलेला आहे. वरून दगड, मातीचे धस कोसळत असतात. त्यामुळे येथे संवरक्षक जाळी बसविणे गरजेचे आहे.

Exit mobile version