कर्जतमध्ये राजकीय पक्षात शांतता

। कर्जत । प्रतिनिधी ।
राज्यातील राजकीय घडामोडींचे पडसाद कर्जत तालुक्यातही उमटत असून, येथील आ.महेंद्र थोरवे हे सुद्धा बंडखोरीत सहभागी झाल्याने शिवसेनेत कमालीचा सन्नाटा निर्माण झाला आहे. थोरवेंच्या भूमिकेवरच आता मतदार संघातील राजकीय फेरबदल अपेक्षित आहेत.

सध्या आमदार महेंद्र थोरवे यांच्या बंगल्यावर सामसूम असून, कोणीही उघडपणे काहीही बोलायला तयार नाही. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर आपली मत मांडण्यास तसेच काही कमेंटस करण्यास मनाई केली आहे. तर अन्य सोशल मीडियाच्या ग्रुपवर यापुढे कर्जत मतदारसंघाचा आमदार भाजपचा असेल, अशी टिपणी एका भाजप कार्यकर्त्याने केली आहे.

मतदारसंघातील शिवसैनिक, तसेच समर्थक अजूनही आमदार महेंद्र थोरवे शिवसेनेतच असल्याचा दावा करत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर मते मांडण्यास मनाई केली आहे. या सर्व घडामोडींवर स्थानिक शिवसेना नेते टीव्हीच्या माध्यमातून लक्ष देऊन आहेत. सर्वसामान्य नागरिक आपआपल्या परीने वेगळे राजकीय तर्कवितर्क लढवत आहे.

Exit mobile version