जिल्हा परिषद भवनात शुकशुकाट

। रत्नागिरी । प्रतिनिधी ।

विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता लागू होऊन अर्ज दाखल करण्याला प्रारंभ झाला आहे. निवडणुकीच्या कामात अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असणार्‍या जिल्हा परिषद भवनात शुकशुकाट पसरला आहे. यामुळे नागरिकांच्याही कामाचा खोळंबा होऊ लागला आहे.

विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतर अनेक शासकीय कार्यालयांतील कर्मचारी व अधिकार्‍यांची नेमणूक निवडणुकीच्या कामासाठी करण्यात आली आहे. या कालावधीत सर्व शासकीय योजना व विकासकामे बंद असल्याने शासकीय कार्यालयांमधील नागरिक व ठेकेदारांची वर्दळ घटली आहे. जिल्हा परिषदेतही हेच चित्र असून, आचारसंहिता लागल्यापासून सर्वच विभागांत शुकशुकाट आहे. आचारसंहितेमुळे अधिकारी व कर्मचार्‍यांवरील कामाचा ताण कमी झाल्याने त्यांच्या चेहर्‍यावर समाधानाचे वातावरण आहे. मात्र, कार्यालयीन कामकाजातून जराशी विश्रांती मिळते ना मिळते तोच निवडणूक कामासाठी आयोगाने अधिकारी व कर्मचार्‍यांना ऑर्डर काढल्या आहेत. त्यामुळे या निवडणूक कामासाठी हे कर्मचारी हजर झाले आहेत.

Exit mobile version