| पनवेल | वार्ताहर |
अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. या धडकेत पादचार्याला उजवा पाय व डोक्यात दुखापत झाली असून, याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुकापूर येथे राहणार्या रिक्षा चालक बद्रीनाथ वावळ हे पनवेल बस डेपो येथे उतरून पायी चालत शिवनगर येथे जाण्यास निघाले. ते विजय सेल्स तिथून नवीन पनवेलकडे जाणार्या ब्रिजवरून नवीन पनवेल बाजूकडे पायी चालत जात असताना कांडपीळे यांच्या सीएनजी पेट्रोल पंपाजवळील सर्विस सेंटरच्या लाईनीत आले. त्यावेळी अज्ञात वाहनाने त्यांना ठोकर मारून अपघात केला. यात ते खाली पडले त्यांना उपजिल्हा रुग्णालय, पनवेल येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर तेथून एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे नेण्यात आले. यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला असून डोक्याला मार लागला आहे. या धडकेनंतर अज्ञात वाहन चालक पळून गेला आहे.