अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर कोन गावाजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 35 ते 40 वर्षीय अनोळखी पादचाऱ्याचा मृत्यू झाला. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पनवेल तालुका पोलीस मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत.

पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील डाव्या लेनमध्ये किलोमीटर 9.200 येथे हा अपघात झाला. वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचा रंग गोरा, बांधा मध्यम आणि चेहरा उभट आहे. त्याने काळी पॅन्ट व काळा शर्ट परिधान केला होता. मृत व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित काकडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Exit mobile version